वरील दोन प्रतिसादां प्रमाणेच मलाही, मनोगतींच्या लेखनात, असा काही गोंधळ जाणवलेला नाही.

गीतेमधील "ज्ञान, विज्ञान" यांत स्वतःबद्दल किंवा आत्म्याची माहिती म्हणजे "ज्ञान" आणि बाह्य जगाची माहिती "विज्ञान" असे ढोबळमानाने म्हणता येईल.

आपण म्हणता आहात त्यावर जरा शंका येते. विज्ञान हा शब्द 'विशेष ज्ञान' अशा अर्थाने वापरला गेला आहे असे वाटते, न की केवळ 'बाह्य जगाच्या माहितीसाठी' असा याचा वापर सीमित आहे. कारण ज्ञान झालेल्या जीवाला नंतर विज्ञानावस्था प्राप्त होते असे वाचलेले स्मरते.
ज्ञानमय कोशापेक्षा सूक्ष्म असा विज्ञानमय कोश आहे. त्यामुळे अर्थातच ती उच्चावस्था आहे.
(ही माहिती बरोबर आहे का याची कल्पना नाही. कोणी तज्ञाने यावर प्रकाश टाकला तर बरे होईल.)
--लिखाळ.