"मनोगतींच्या डोक्यात असा गोंधळ आहे" असे मी लिहिलेले नाही. वर नमूद केलेल्या मनोगतींचे विचार अगदी स्पष्ट आहेत.

शास्त्र या ऐसपैस शब्दाच्या सध्याच्या अर्थामध्ये विज्ञानाचा(सायन्सचा) सुद्धा समावेश होतो पण सर्वच शास्त्रे ( भाषा, संगीत इ,) संपूर्णपणे सायन्सवर आधारलेली नाहीत. त्यामुळे शास्त्रीय म्हणजे शास्त्राप्रमाणे की सायंटिफिक असा गोंधळ होतो. या दोन्हीमध्ये निश्चितच फरक आहे.

चर्चेमधील कांही भाग खाली उधृत केला आहे, त्यावरून विचारातील विसंगति लक्षात येईल.  यालाच मी गोंधळ समजतो.

लेखातील व सहमति दाखवणारी वाक्येः

देवकार्य म्हणजे पूजा, होम व नित्य आन्हिक आणि पितृकार्य (म्हणजे श्राद्ध) या धार्मिकप्रसंगी अंगावर नेहमीचे कपडे असणे योग्य नाही. यामागे नुसता धार्मिक दंडक आहे असे नाही तर वैज्ञानिक कारणेही आहेत.
नेहमीच्या कापड्यांवरील धुळ च नव्हे तर संस्कारही त्यांच्यावर काही अंशी कायम राहण्याची शक्यता असते.
धार्मिक कार्यांच्या वेळी मंत्रोच्चारातून उठणारी ध्वनीस्पंदने व विद्द्युत- लहीरी शीघ्रपणे अंगभर फिरण्यासाठी अंगास घर्षण होणारे रेशमी किंवा लोकरीचे वस्त्र अधिक लाभदायक ठरते.
"आपल्या" शास्त्रात सांगितलेल्या नियम वा रूढिंचा असाच आधुनिक विज्ञान व मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा, अशा स्वधर्माच्या पालनाने  निश्चितच प्रगति साधता येइल.
शास्त्राचा आणि विज्ञानाचा जवळचा संबंध आहे हे कित्येकदा ऐकले होते परंतु तुम्ही त्याची सविस्तर माहिती देऊन आमच्या ज्ञानात भर टाकत आहात.
या प्रकारची मीमांसा करताना आपण केवळ  आधुनिक - ( खरे तर प्रायोगिक म्हणावेसे वाटते) भौतिक विज्ञानातील प्रस्थापित सिद्धांत वा उर्जारुपांचा विचार करणे सयुक्क्तिक होणार नाही,
इतकेच कश्याला आपल्या शास्त्राप्रमाणे आसन सुद्धा सिध्द करुन घ्यावे लागते.
जी (स्टॅटीक) इलेक्ट्रीसिटी उत्पन्न होते ती शरीरावरून फिरते व त्यामुळे जे परिणाम होतात ते हृदयाची स्पंदने, मनाची चलबीचल शांत करावयास  उपयोगी होतात.
म्हणून प्राचीन कालांत ह्या सर्व चक्रांचा सखोल व प्रयोगांसह शास्त्रोक्त अभ्यास करून आन्हीकाची रचना केलेली आहे. 
शास्त्र आणि विज्ञान यांची चांगली सांगड लेखात घातली गेली आहे.

कांही विरुध्द प्रतिक्रिया
तुम्ही शास्त्र सांगितलेत, त्यातले विज्ञान पण सांगा ना!
कुसंस्कारांनी भरलेला पोषाख? पोषाखावर कसले संस्कार होतात?
ह्यासाठी आपणाकडे काही वैज्ञानिक आधार आहे का? असल्यास त्याचा संदर्भ कृपया देत जा.

तुमचे सगळे विचार धार्मिक आणि श्रद्धा यानावाखाली मांडत जा. ज्यांना पटतील ते वाचतील बाकीचे सोडून देतील.कोणत्याही आधाराशिवाय 'वैज्ञानिक दृष्टया' वगैरे शब्द वापरू नका.

तसेच सगळ्या रूढी/प्रथा ह्या पूर्वजांनी काही 'शास्त्रीय' दृष्टीकोन बाळगून त्यानुसार पाडल्या होत्या असेही मानण्याचे कारण नाही.