योगायोग म्हणजे नुकताच मी काही दिवसांपूर्वी ताजमहाल बघुन आलो आहे. पू. ना. ओकांच्या पुस्तकाची मला कल्पना होती आणि मी ते फारा दिवसांपूर्वी चाळलं पण होतं. तेंव्हा मी तिथे गेलो असता जरा डोळसपणे आजुबाजूला बघत होतो, पण मला काही तसं पूर्वीचे शिवालय असल्या सारखं वाटलं नाही. ह्याउलट कुतुब मिनारला गेलो तर हमखास लक्षात येतं कि इथे आधी मंदिरं होती.

असो. स्टीवन नॅप ची चित्रं अगदी विलक्षण आहेत, तेव्हा "ताजमहाल" आधी "तेजोमहाल" होता कि नाही ह्यावर माझॅ अजूनही काही मत नाही, शक्यता नाकारता येत नाही हे खरे.