पहा बुवा /बाई कसं वाटतं.आणखी काही ओळी सुचताहेत.

आजच का ती खपली उडाली

आजच का  जख्म ओली जाहली

आजच का तो बांध ही फ़ुटला

आजच का  तो संयम सुटला

आजच का मन  उदास जाहले

आजच का पळ ते दीर्घ भासले

आजच का  दिन सरत नाही

सांजही कातर ढळत नाही

रात्र होईल  वैरिण जणू काही

सरता कधि ती सरणार नाही

उदासी ती ही वाढत जाईल

कातरताही असह्य होईल

 

चंद्र परांजपे