मीच तो कल्की असे सांगणारे बरेच शहाणे दर ३-४ वर्षांत पुढे येत असतात. तर काही भक्तगण आपल्या गुरुंचा समावेश कल्की अवतारात करत असतात.
काही वर्षांपूर्वी अशी रेवडी अनिरुद्ध बापूंच्या भक्तगणांनी उडवून दिली होती. त्यातल्या एक काकी मुक्तकंठाने बापूच कल्की असल्याबद्दल "पुरावे" देत होत्या.
त्यांना विचारले मग बापूंकडे पांढरी शुभ्र मर्सिडीज् असेल नाही कारण कल्कीकडे पांढरा शुभ्र अबलख घोडा होता. (जाम वैतागल्या माझ्यावर हे सांगणे न लगे)