आपल मन हे नेहमी आपलच असते,

माण्साला मनाएवढ जवळच दुसर कुणीच नसते.

अस असूनसुद्धा एक प्रश्न नेहमी पडतो,

मनाचा मनाशी लपण्डाव का चालतो?

प्रश्न करणा-या मनात उत्तरही तयार असते

मनही कप्प्याकप्प्यात विभागुन रहाते.

कधी प्रकाशा च्या किरणानी स्फटिकसारख चकाकते,

तर कधी काळोखाच्या भीतीने गच्च दार लावून घेते.

कधी मनोगताच्या वारूवरून दूर सैर करून येते,

कधी मात्र चोरासारख आतच लपुन राहते.

आपले मन हेच शेवटी आपले असते,

क्षणोक्षणी स्वतःलाच आजमावत राहते.

                                             स्मिता