अधिकारी व्यक्तीची मते उद्धृत करून ज्ञान व विज्ञान या संबंधीचे माझे अज्ञान थोडे दूर केलेत याबद्दल धन्यवाद. विज्ञान या विषयाचा प्राचीन कालीन अर्थ सायन्स या इंग्रजी शब्दापेक्षा वेगळा होता एवढेच मला सांगायचे होते. श्रवणभक्तीमधून मला जेवढे संगीत समजले आहे त्यानुसार भूप व देसकार हे दोन्ही राग सारेगपधसा या पांच स्वरावरच बांधलेले आहेत. त्याच्या गायनामधून व वादनामधून ते वेगवेगळ्या पद्धरीने सादर केले जातात.

शास्त्र या शब्दाला सायन्स हा एक अर्थ अलीकडेच चिकटलेला आहे. परंतु आजकाल ज्या पद्धतीने हा शब्द वापरला जातो ( भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, पाकशास्त्र, वास्तुशास्त्र, नृत्यशास्त्र, नाट्यशास्त्र इ.) त्यांत विज्ञान, कला आदि अनेक विषय समाविष्ट होतात. हाच तर माझ्या लेखाचा गाभा आहे.