कुशाग्र यांनी कालच मनोगतावर आपले पहिले वर्ष पूर्ण केले. अभिनंदन!!
त्यांच्या येथील वावराने मनोगतास एक वेगळीच खोली, उंची आणि गोडीही प्राप्त होते असे मला वाटते. त्यांचे मोहवून टाकणारे ज्ञानेश्वरीचे ओव्यार्थ खूप आनंद देऊन जातात हे विशेष नमूद करावेसे वाटते.
यापुढेही कुशाग्रांची साथसंगत आम्हा साऱ्यांना मिळो हीच आजची सदिच्छा!!