कोणत्याही वेबपेजचा ताजेपणा टिकवून ठेवणे सतत नवी माहिती चढवणे एक वेबपेज तयार करणाऱ्या व्यक्ती समोरचे,संस्थे समोरचे मोठे आव्हाने असते.

मी साधारणता दीड वर्षापूर्वी माझी विकिशी ओळख झाली ती,तेंव्हा वस्तुतः मी त्यावेळी महाराष्ट्र मंडळ करिता-माझे अल्प स्वल्प trial and error ज्ञान वापरून- एक संकेत स्थळ बनवण्याच्या विचारात  होतो, bbc world service वर विकिपीडिया चे संस्थापक जिमी वेल्स यांची मुलाखत ऐकल्यामुळे माझा असा गोड समज झाला की विकिवर संकेत स्थळ कोणत्याही विषयावर बनवता येते आणि कुणी पण संपादन करू शकते . मला अती आनंद झाला एकाच माणसावर म्हणजे माझ्या एकट्यावर वेबपेज अपडेटचे ओझे कमी झाले असते असे वाटून लगेच विकिपीडिया चा google वर शोध घेऊन प्रयोग काही वाक्ये लिहून सेव्ह केला . दुसरे दिवशी पेज उघडून बघतो तर त्या वर deletion ची चक्क नोटिस लागलेली. अधिक माहिती घेतली तर लक्षात आले community pages म्हणून विकिपीडिया वापरता येत नाही तो फक्त एक encyclopedia आहे.

मग इतर काही लेख वाचून दुसरा एक लेख लिहिला त्या लेखाला पण deletion  notice का तर म्हणे यावर पहिले किंवा मुळलेखन प्रसिद्ध करायचे नसते. म्हटलं तकतकच आहे सगळी. मग काही काळ  विकिपीडिया कडे दुर्लक्ष केले. नाही म्हणायला थोडे इंग्रजी विकिपीडिया वर वाचन चालू राहिले. कालांतराने एक दोन गोष्टी लक्षात आल्या एकतर  विकिपीडिया गळ्याखाली उतरण्यास वेळ लागला तरी अगदीच तकलादू संकल्पना नाही,विकिपीडिया ची मराठी आवृत्ती पण आहे. पण तिथे हे लोक मराठीत लिहितात कसे हे कळत नव्हते.

तसा मराठी शब्दांच्या images बनवण्या साठी बराहा  editor चा उपयोग सुरू केलेला होता. सहज चाचपण्या करिता एकदा baraha direct utility,उघडून पाहिली आणि लक्षात आले की सोय सोपी आहे. मराठी विकिपीडिया तील अविशिष्ट लेख टिचकी मारावी तिथे रिकामे त्यातील एक दोन  लेख लिहून पाहिले पण समाधान नव्हतेच खुप थोडे लोक मराठी लेख लिहितात माझ्या सारख्या नवशा गवशांचे राज्य बऱ्या पैकी आहे असे लक्षात आले. अजून तज्ञ हौशी लोक यावेत त्यांनी काही लिहावे असे वाटले म्हणून हा मनोगत वर येण्याचा सारा प्रपंच केला . 

मनोगतींचे विकिपीडिया बद्दलचे विविध आक्षेप वाचले सर्वच आक्षेप चुकीचे नाहीत त्यात काही तथ्य आहे स्वतः विकिपीडिया चे संस्थापक जिमी वेल्स यांनी विद्यार्थी वर्गास विकिपीडिया चे संदर्भ शैक्षणिक संशोधनात उधृत न करण्याचा सल्ला देतात.विकिपीडिया संकल्पना वेगळी आहे  याचा अर्थ विकिपीडिया पण पूर्ण  टाकाऊ आहे असा निश्चित होत नाही. 

विकिपीडिया ला नवशा आणि गवशांचा अजिबात त्रास होत नाही असे नाही परंतु तज्ञांचे योग्य पुरावायुक्त माहितीस हात लागू नये लागला तर तो सुधारला जावा इतपत हौसे तिथे नेहमीच उपलब्ध राहतं आले आहेत.काही हौसे फक्त लिहिण्याची हौस बाळगतात काही दुरुस्त्या करण्याची,काही आहे त्या चांगल्या लेखांना सांभाळण्याची. एकूण over a period of time  balance साधला जातो.

पण विकिपीडिया ची खरंच गरज आहे का? मला वाटते ती तशी आहे.Google  वरून मिळणारी searches विस्कळीत असतात एवढे करून सर्व माहिती एके ठिकाणी पाहण्यास मिळेल असे होत नाही.छापील मजकुराची कागदाची मर्यादा नसल्या मुळे मजकूर त्रोटक आणि विस्तृत दोन्ही स्वरूपात उपलब्ध करून देता येतो. विकिपीडिया  एकतर ज्ञानकोश ची गरज भागवतो.विकिपीडिया चे स्वरूप स्वयंसेवी आहे internet उपलबद्ध असलेली कोणतीही व्यक्ती याचे लेखां मधील माहितीत सुयोग्य बदल घडवू शकते

एका पेक्षा अधिक व्यक्तींनी माहिती संपादीत करत गेल्या मुळे माहितीत ताजे पणा संतुलित पणा येतो.अधिकाधिक संपादना नंतर कालपरत्वे लेख परिपक्व होत जातात.वेगाने बदल करणे सहज शक्य असल्यामुळे अद्ययावत माहिती उपलब्ध असू शकते.

विकिपीडिया वरील लेख शोधाभ्यासासाठी अवलंबून राहण्याइतपत खात्री लायक असतील हे नक्की नसते. परंतु एखाद्या संकल्पनेबद्दल इतरांची मते सहजपणे तौलनिकदृष्ट्या अभ्यासता येतात. अभ्यासाची किंवा शोध निबंध संकल्पनेची आणी शोधांची सुरवात करता येते.

विषयांचा परिघ सामान्य ज्ञानकोशा पेक्षा व्यापक असतो. अत्यंत छोट्या भाषेतील भाषासमुहातील लोकांकडची छोट्यात छोट्या माहितीचे संकलन शक्य होते.

दुसरे तर प्रत्येक तज्ञ हा कुठेतरी माणूस असतो त्याच्या वैयक्तिक विचारांचा प्रभाव कुठे न कुठे लिखाणावर पडत असतो . विकिपीडिआवरील लेख पुन्हा पुन्हा आढावा घेऊन संपादित होतात त्यामुळे प्रत्येक आवृत्तीगणिक त्यातील एकांगी पणा कमी होण्यास मदत होते. कालांतराने तर्क निष्ठता वाढू शकते. विकिपीडियातील लेखांनी सर्व संबंधित बाजूंचा सर्वसमावेशक तपशील देणे अपेक्षित असते.

विकिपीडिआ:परिचय या लेखात नियमांची माहिती वाचण्यास मिळते.विकिपीडियाचे बहुसंख्य नियम बंधने अस्थायी आहेत. ते सहसा विकिपीडियातील लेखांच्या योग्य सुधारणांच्या आड येत नाहीत. सर्व नियम सर्वानुमते बनवले जातात.येथे कुणीही व्यक्ती peer reveiw नंतर administrator समन्वयक होऊ शकते.  

विकिपीडिया, विकिपिडीयाची वैगुण्ये  गृहीत धरून सुद्धा त्याच्या मुकत सार्वत्रिक उपलब्धते मुळे, विविध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणां मुळे आज internet वरील सर्वाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश झाला आहे.

फुल नाहीतर पाकळी ज्ञानयज्ञात वाहण्याची संधी विकिपीडिया मुळे मिळते. आणि हे जे मी इथे लिहू शकलो ते सर्व वैयक्तिक अनुभव विकिपीडिया वर लिहिता येत नाहीत म्हणून मनोगत सारखे मराठी ब्लॉग्स सुद्धा हवेत.

कळावे लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा!