विज्ञानामध्ये नैसर्गिक नियमांचा अभ्यास केला जातो तर शास्त्रांमध्ये निसर्गनिर्मित तसेच मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारचे नियम येतात हे एक स्थूलमानाने केलेले त्यांचे वर्णन झाले, शास्त्र आणि विज्ञान यांच्या प्रचलित संकल्पनांमधील मुख्य फरक सांगण्यासाठी दिलेली त्यांच्याबद्दलची सर्वसामान्य माहिती झाली. ती कांही व्याख्या नव्हे.
ज्योतिष हे विज्ञान आहे की नाही यावर जाहीर चर्चा झाली होती व दोन्ही बाजूने मते मांडण्यात आली होती त्याअर्थी अशी सर्वमान्य व्याख्या उपलब्ध नाही असेच दिसते. कांही ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी त्या चर्चेत असे सांगितले होते की वस्तुनिष्ठता, स्थलकालनिरपेक्ष असणे व प्रयोगाने सिध्द करण्याजोगे असणे हे विज्ञानाचे कांही निकष आहेत.
ते गणिताला लागू पडतात असे निदान मला तरी वाटते.
भाषाशास्त्र हा माझा विषय नसल्यामूळे व मराठीमध्ये लिहिण्याचा सराव नसल्याने शब्दरचनेत गफलती होत असतील तर त्याबद्दल क्षमस्व.