विज्ञान किंवा सायन्समध्ये फक्त निसर्गनिर्मित किंवा (आस्तिक लोकांच्या) परमेश्वराने केलेले नियमच येतात व ते सर्वांना समान प्रकारे लागू होतात हा एक या दोन्ही संकल्पनांमध्ये महत्वाचा फरक आहे. माणूस हे नियम फक्त समजून घेऊ शकतो, ते करू किंवा बदलू शकत नाही. विज्ञानाचे नियम स्थळकाळातीत असतात. कोणीही ते सप्रयोग सिद्ध करू शकतो.
आम्ही १९५८ साली कॉलेजमध्ये विज्ञानशाखेला प्रवेश घेतला त्यावेळी सुरवातीच्या लेक्चरमध्ये सायन्स ची व्याख्या खालीलप्रमाणे सांगण्यांत आली होती
Science is the continuous discovery of its own mistakes.
याचे कारण सायन्समधील गृहीतके (थिअरीज या अर्थी) बदलत असतात हे असावे. उदाहरणार्थ डाल्टनच्या ऍटॉमिक थिअरीनंतर नवीन ऍटॉमिक थिअरीज आल्या.