>>मी एक संगणक अभियंता आहे, आणि दूर्दैवाने या क्षेत्रातील लोकांकडे शुद्धलेखन तपासायच्या एवढावेळ नसतो.<<

बाकिचे लोक रिकामटेकडे असतात का हो? सतत संगणकापुढे बसून या महाजालाचे व्यसन लागलेले ५०% हून अधिक लोक संगणक अभियंतेच तर दिसतील. काहितरी कारणं.. मान्य करा की.. बिल्कुल सराव नाही म्हणून.. उगाच तुमच्या क्षेत्राची टिमकी कशाला.

चला हे काम तर मी मराठीसाठी केलं. मराठी शुद्ध न लिहिण्याबद्दल कारणं देणाऱ्याला कारणांना काही अर्थ नाही हे ठणकावून सांगितलं..

पण मराठीसाठी आपण काही करतो याच्यात आपला मोठेपणा काय? म्हणजे कसं की भ्रष्ट्राचार न करणे, आपले काम प्रामाणिकपणे करणे या मूळ अपेक्षा असतात कुणाही माणसाकडून त्या पूर्ण केल्या तरी हल्ली कौतुक होते तसे झाले.  मराठी बोलणे, मराठी वागणे ही आपली जबाबदारी आणि नशीब दोन्ही आहे त्याप्रमाणे वागल्याचे काय कौतुक? तेव्हा कौतुक बाजूला ठेवून काही गोष्टी बोलूया..