सुखविंदर सिंघचं गाणं मला बरेचदा ज्या कारणांनी आवडत नाही त्याच कारणांनी मला हिम्मेशचं गाणं आवडत नाही - कारण त्या गाण्यात सहजता नसते आणि गाण्याचा विषय खूपच क्वचित आरोळ्या ठोकण्यास योग्य असतो. अजून एक मला वाटतं की हिमेशच्या गाण्यांमध्ये तोचतोचपणा आहे, त्यामुळे नवीन चाल समजली की त्यातलं नावीन्य संपतं. सानुनासिक स्वराबद्दल माझं काहीही म्हणणं नाही.
आणि हो : मनोगतची पाटिलकी मला बहाल केल्याबद्दल आभारी आहे! आता खिरें पाटील म्हणून मला खो खो पाटलापेक्षा लोकप्रियता मिळेल अशी अपेक्षा करतो!