सोनाली,
तुमचे रसास्वाद वाचुन आनंद झाला. रसास्वाद छानच आहे यात शंकाच नाही.
तुम्ही दुर देशात राहतात, मराठी भाषिक / मराठी प्रेमी भेटणे इत्यादी गोष्टी अवघड आहे हे माहित असुनही खालील सुचना करतो.
जमल्यास तुम्ही किमान २/४ जणांचे मंडळ बनवा. हळुहळु यात वाढ होत जाईल. सुरवातीला महिन्यात एकदा ठरवलेल्या पुस्तकावर चर्चा करावयाची असे ठरवा. (रसास्वाद हा खरोखरच छान शब्द आहे.) या मध्ये पुस्तकांचे आदान-प्रदान सुध्दा करता येईल. अनेक उदयोन्मुख कवी - लेखकांना यातुन उत्तेजनपण देता येईल.
सुरवात तर करुन पाहा. काही अडचणी आल्यास विनासंकोच विचारा. मनोगत वरील "होम्स चातुर्यकथा अभ्यासमंडळ" हा माझा लेख वाचल्यास हि संकल्पना अजुन स्पष्ट होईल.
शुभास्ते पंथानु...
द्वारकानाथ