पडीक राहण्याचा, टवाळकी करण्याचा, खोड्या काढण्याचा, कंपूबाजीचा हा सर्वोत्कृष्ट मराठी इ-कट्टा आहे. त्याला तसाच राहू द्या की, राव.

हे आपले खोडसाळ मत. थोड्याबहुत खोड्या असाव्यात. पण थोड्याच. नाहीतर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सेवाभावी संस्थेचे स्वरूप येईल. मनोगत आपल्या श्रेणीतले सर्वोत्कृष्ट मराठी समुदाय संकेतस्थळ ((कम्युनिटी वेबसाइट) आहे, हे नक्की. कट्टा हा शब्द आम्हाला आवडत नाही. सवंग आहे.

माझ्या मते तुलना केल्यास, मनोगतावर फार चांगल्या भाषिक आणि अन्य चर्चा, कविता, कथा, तांत्रिक लेखन झाले आहे, होते आहे. मनोगतींचे लेखन वृत्तपत्रांतही  प्रकाशित झाले आहे. आणि हे सर्व ह्या पुढेदेखील होत राहील.

मनोगतावर वाद, विवाद होत असतो आणि नुसती 'छान, अप्रतिम, खल्लास, झकास, मार डाला' प्रशंसा होत नसते, ही फार चांगली गोष्ट आहे.

कंपूबाजी काय सर्वत्र आहे. पडीक राहावेसे वाटण्यासारखी हे संकेतस्थळ असावे म्हणूनच लोक पडीक राहतात. त्यामुळेच की काय मनोगताकडे बरेच मायग्रेशन होते आहे.

सदस्यसंख्या वाढते आहे. त्यामुळे कोलाहलही वाढणे साहजिक आहे. पण म्हणून तु्म्ही चुकीचे निष्कर्ष कशाला काढता? तुम्ही मनोगताचे शत्रू आहात काय?

चित्तरंजन भट