मिलिंदा,
प्रश्न १, २ आणि ३ ह्यांची उत्तरे मला खरच माहीत नाहीत. वाल्मिकी रामायण देखील संपूर्ण वाचले नाही आणि रामायणावरील रामायणेतर पुस्तकेही वाचनात आलेली नाहीत. रामायण हे महाभारताच्या बरेच आधी घडले आहे. महाभारतांतील कोणतेही पात्र रामायणात उल्लेखिलेले नाही. महाभारतात रामायणाचे बरेच उल्लेख आहेत. अर्जुनाच्या रथावर हनुमान बसलेला असतो.
पुनर्जन्माबद्दल म्हणायचे तर वेदांमध्ये उल्लेख आहेतच, पण उपनिषदे तसेच भगवद् गीतेतही खुद्द कृष्णाच्या तोंडी अनेक उल्लेख आहेत. सर्वात पहिला उल्लेख आहे तो २.१२ व १३ मध्ये आहे - श्रीकृष्ण म्हणतात, " मी, तू व हे राजे पूर्वी नव्हतो असे नाही. तसेच यानंतर आपण सर्वजण असणार नाही असेंही नाही. देहयुक्त आत्म्याला ज्याप्रमाणे देहामध्यें बाल्य, तारुण्य व वार्धक्य असतात त्याचप्रमाणे एक देह जाऊन दुसऱ्या देहाची प्राप्ती होत असते. ", आणखी ६.४१, ८.१६ इथेही पुनर्जन्म होतो हे स्पष्ट आहे.
विरभि -