मनोगतावर बराच काळ राहिले, वाचत राहिले की इथल्या वावराबद्दल अंदाज येतो.  मुंबईत सतत वर्षानुवर्षे एकाच लोकल गाडीने प्रवास करणारे कुठे एकदम मित्र बनतात?  हळुहळू आपल्यासम विचाराची/आचाराची व्यक्ति दिसली की प्रथम थोडे स्मितहास्य, मग औपचारिक हवापाण्याच्या गोष्टी करून मग पुढे "काही" जणांशी मैत्री होते.

विक्रेत्यॉहा साधारण आडाखा असतो.  शंभरांशी संपर्क साधला तर त्यातले १० त्यात रस दाखवतात.  त्या १० पैकी एखादाच तुमचा माल/ सेवा खरेदी करतो.  मैत्री संबंधाचे सुद्धा असेच आहे.

कृपया निराश होऊ नका.  इथे तुम्हाला आनंद मिळेलच.

कळावे लोभ असावा,
सुभाष