वैयक्तिक ओळखी म्हणजे "डेटिंग क्लब"च वाटतो का? फक्त हेच विचार तुमच्या मनात येतात का?
मजेशीर नावाना मजेशीर प्रश्न विचारले तर फक्त वाईटच अर्थ निघतो??
वाटेत जाता येता , प्रवासात ओळखी होतात त्या फक्त "डेटिंग" साठी??
हे म्हणजे वेळ विचारली तर माझ्या मुलिचा हात मागेल म्हणुन किती वाजले हे सांगायचे नाही त्यातला हा प्रकार झाला.(हा चुटका माहीत असेल असे ग्रुहीत धरले आहे)
सर्वानाच चांगले लिहीता येत नाही.
या मायाजालात आपले कोणी ओळखीचे आहे ही कल्पनासुद्धा मजेशीर आहे.
पण कोणी माझ्याशी ओळख करावी म्हणून सारखे कोणाला निरोप पाठवत सुद्धा बसलो नाही.
कधीकाळी या मायाजालात फेरफटका मारला तर कोणी ओळख दाखवावी एवढीच माफक अपेक्षा असते.( सगळ्यांचीच असावी असे वाटते)
असो......