वैयक्तिक ओळखी म्हणजे "डेटिंग क्लब"च वाटतो का? फक्त हेच विचार तुमच्या मनात येतात का?
हो. जेव्हा 'वयाने' मोठी माणसं मला कोणी ओळख देत नाही म्हणून गळा काढतात तेव्हा असेच विचार माझ्या मनात येतात.
मजेशीर नावाना मजेशीर प्रश्न विचारले तर फक्त वाईटच अर्थ निघतो??
विचारायची गरज काय? आणि तशी गरज तुमच्याकडे असेल तर एखाद्याला अशा प्रश्नाच उत्तर द्यायची गरजही नसते.
वाटेत जाता येता , प्रवासात ओळखी होतात त्या फक्त "डेटिंग" साठी??
नसाव्यात पण प्रवासात ओळख झाली नाही म्हणून व्ही.टी., चर्चगेट. बॉम्बे सेंट्रल, एअरपोर्ट आणि इतर थांब्यांजवळ तुम्ही "मला कुणी ओळख देत नाही हो" म्हणून जाहीर पत्रक लावता का?
सर्वानाच चांगले लिहीता येत नाही.
१००% मान्य. यात न्यूनगंड तो कसला? प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे अस आहे का. निदान वाचता येत आणि एखाद्याच्या लिखाणाच कौतुक करता येत, टीका करता येते हे ही खूप नाही का?
या मायाजालात आपले कोणी ओळखीचे आहे ही कल्पनासुद्धा मजेशीर आहे.
आहे खरी.
पण कोणी माझ्याशी ओळख करावी म्हणून सारखे कोणाला निरोप पाठवत सुद्धा बसलो नाही.
करू ही नका ते सभ्यपणाचे लक्षण नाही. पण अशी चर्चा तरी कशाला करायची?
कधीकाळी या मायाजालात फेरफटका मारला तर कोणी ओळख दाखवावी एवढीच माफक अपेक्षा असते.
ही माफक की अवाजवी ते ठरवणे कठीण आहे. ओळख करण्यासाठी अनेक इतर सुविधा महाजालावर आहेत त्याचा उपयोग करावा.
इतरांनी आपली हद्द ठरवण्यापूर्वी आपणच आपली हद्द ठरवणे फायदेशीर असते.