त्याकाळची सामाजिक मानसिकता पाहता शास्त्रीबुवांचे वागणे निश्चितच कौतुकास्पद वाटते.
कौतुकास्पदचे सोडाच, पण एक 'पब्लिक पोझिंग' यापलीकडे या कृत्यात काय दिसले, कळत नाही.
शास्त्रीबुवानी शांतपणे फ़लाहार केला. लोकाना या विद्वानाचं कौतुक वाटलं.शास्त्रीबुवांनी तात्यांच्या कार्याचं कौतुक केलं. समाधान व्यक्त केलं.एका विद्वानाला दुसऱ्या विद्वानाने दिलेला प्रतिसाद.
लोकांनी शास्त्रीबुवांचे कौतुक केले, शास्त्रीबुवांनी तात्यारावांचे... (You scratch my back and I'll scratch yours?) पण ज्यांच्यासाठी म्हणून हा कार्यक्रम supposedly चालला होता, त्यांचे काय? त्यांना यातून काय मिळाले?
माफ करा, सावरकरांबद्दल अनादर दाखवण्याचा उद्देश नाही, पण सावरकरांच्या नावावर भलत्यांच्या भलत्या / दिखाव्याच्या (असे मला तरी वाटते) गोष्टींचे कौतुकही पटत नाही. (म्हणजे मुळात हा कार्यक्रम कशासाठी चालला होता? शास्त्रीबुवांच्या गौरवासाठी? नसेल तर मग या गोष्टीचे महत्त्व काय?)
- टग्या.