हा लेख वाचला आणि काही वर्षांपूर्वी दूरचित्रवाणीच्या एका वाहिनीवर सादर झालेली 'स्वप्नांचे सौदागर' (ड्रिम मर्चंटस) आठवली.
एकुण दैनंदिन जीवनात असलेले जाहिरातींचे स्थान चांगले व्यक्त केले आहेस.
जाहिरात हा विषय मोठा मनोरंजक आहे आणि तितकाच व्यापकही. मात्र हे दुधारी शस्त्र फ़ार सांभाळुन हाताळावे लागते नाहीतर चालवताना आपलाच हात कापला जाउ शकतो. याचा एक सुप्रसिद्ध किस्सा सांगतो, कदाचित तुला माहीतही असेल. एकदा एका सौंदर्यप्रसाधने बनविणार्या बहुराष्ट्रिय कंपनीने आपले चेहेरा सतेज करणारे सौंदर्य मलम सौदी मध्ये उतरवले. काही दिवसातच त्यांना समजले की विक्री काही अपेक्षेनुसार होत नाही. मग त्यांचे जाहीरात विभागाचे लोक तिकडे पाठवले. त्यांनी आपल्या प्रचाराचा एक भाग म्हणून मोक्याच्या जागी जाहीरात फ़लक लावले. त्या फ़लकावर तिन चित्रे होती आणि खाली त्या उत्पादनाविषयीची माहीति होती. पहील्या चित्रात एका स्त्रीचा काहिसा सुरकुतलेला आणि सावळा चेहेरा होता. दुसर्या चित्रात ते उत्पादन दाखवले होते. तिसर्या चित्रात तोच चेहेरा सुंदर आणि उजळलेला दाखवला होता. मात्र लवकरच कंपनिला असे दिसून आले की विक्री उलट कमीच झाली आहे. चौकशी अंती असे समजले कि सौदीचे नागरीक उजवीकडून डावीकडे वाचतात आणि बहुसंख्य लोकांना इन्ग्रजी येत नाही त्यामुळे लोकांचा असा समज झाला की हे उत्पादन लावले तर चेहेरा काळवंडतो आणि कोमेजतो:)