छान चाव्या देता...
अर्थात. जे चांगल जमतं ते मनापासून करते.
चार्ली गांधीजीना भेटले तेव्हा असाच विचार केला असता तर?
चार्ली गांधीजींना काही हेतुपुरस्सर भेटले. ती भेट नियोजित आणि आमंत्रित होती.
बाकी काही प्रश्न तुम्हालाही पडतात जसे वय लपवणे वगैरे..
पडतात ना. त्याकरता मला गळा काढून रडायची गरज भासत नाही. माझे प्रश्न योग्य शब्दांत मांडून त्यांना योग्य उत्तरे कशी मिळवायची हे मला माहीत आहे.
आणि वयाने मोठ्या लोकांना नवी मैत्री (मैत्रिणी नव्हे हो) नको असते असे कोणी सांगितले?..
मी तसे कुठे म्हंटले? दाखवा पाहू? वयाचा आणि मैत्रीचा (आणि मैत्रिणींचाही) काहीही संबंध नाही. पण वयासह माणसाने अकलेनेही मोठे व्हावे.
काही मनोगती येवढे एकलकोन्डे असतील असे वाटले नव्हते..
हे तुमचे मत झाले. माझे विचाराल तर "काही मनोगतींशी" वायफळ चर्चा करण्यापेक्षा मला एकलकोंडे होणे पसंत आहे.
असो. आपण काहीही कारण/ प्रयोजन नसताना माझ्या अनुदिनीवरील लेखांचा उपयोग केलात म्हणून हा प्रतिसाद देते आहे. त्या उदाहरणांचा या चर्चेशी काडीमात्र संबंध नाही.
मला अधिक टाइम पास करायचा नाही.