"त्याकाळची सामाजिक मानसिकता" हा महत्त्वाचा संदर्भ आहे, तो सोडून पाहिले तर यात काहीच विशेष वाटणार नाही.

मिलिंदरावांच्या, तुम्ही सहमती दिलेल्या प्रतिसादातून

सवर्णांनी महारांना शेकडो वर्षे वाळीत टाकले. त्यांना मेलेली गुरे फाडून त्यांचे मांस खायला भाग पाडले. दुष्काळात देखील गावातल्या एकमेव विहिरीतून पाणी भरू दिले नाही.

अश्या परिस्थितीत सहभोजनाची कल्पनाही न केलेली बरी. कोणी समाजाच्या विरोधात जाऊन ते करत असेल तर त्यात काहीच विशेष नाही असे म्हणणे पटत नाही.

एक 'पब्लिक पोझिंग' यापलीकडे या कृत्यात काय दिसले, कळत नाही.

फक्त "पब्लिक पोझिंग" कसे? त्या कार्यक्रमात ते सहभागी झाले आणि त्याकाळी असणारा नियम त्यांनी जाणीवपूर्वक मोडला नाही का? वे.शा.सं.  शास्त्रीबुवांनी असे केल्यास त्यांचे अनुकरण करावे असे इतर लोकांनाही वाटले असेल.

वे.शा.सं. लोकांना त्यावेळी असलेले मानाचे स्थान पाहता त्यांचा जनमानसावर प्रभाव असणे निश्चित आहे. अशावेळी या शास्त्रीबुवांनी आपल्या वागणुकीतून उदाहरण घालून दिले आहे असे वाटते.