लेखाच्या भाषेवर आणि सूचकतेवर मतभेद असू शकतात.
टग्या, वैद्य आणि शशांक यांच्या प्रतिसादातील सुरांशीही काही ठिकाणी तारा जुळतात.
मात्र काही प्रतिसादांमध्ये टीका थोडी एकांगी झाली आहे असे वाटल्याने हा भूमिका मांडणारा स्वतंत्र प्रतिसाद.

सावरकरांनी प्रामाणिक भावनेने स्पृश्यास्पृश्यभेद बाजूला सारण्यासाठी सहभोजनासारखा उपक्रम सुरू केला याबद्दल त्यांचे कौतुक.
यांत विशेष ते काय, आणि कोणत्याही सामाजिक नेत्याचे असे उपक्रम करणे हे कर्तव्यच आहे हे मान्य. सावरकरांनीही कौतुकासाठी नाही तर कर्तव्यासाठीच हे केलेले असावे.

शास्त्रीबुवा हे जातीपातीच्या पलीकडे असलेले आणि त्यामुळे जातीपातीच्या पलीकडचा माणूस समजलेले विद्वान होते म्हणून त्यांचे कौतुक.
त्यांनी जे केले त्यातही विशेष काहीही नाही. अगदी बरोबर! शास्त्रींनीही आपण विशेष कौतुकाचे असे काही करत नसून त्यात कर्तव्याचा भाग काहीही नाही याच भावनेने पंगतीत भाग घेतलेला असावा या शक्यतेस धुडकावून लावून शास्त्रींच्या नियतीवर शंका घेणे योग्य नाही.
यांतील कौतुक हा शब्द नेमका का आला यासाठी त्या काळात जायला हवे असे शशांकांनी सुचविले आहे ते ही मला संयुक्तिक वाटते.
(पुन्हा एकवार मुद्दा लक्षात घ्यावा - शास्त्रींना मी हा इतरेजनांवर उपकार करतो आहे असे वाटले असल्यास गोष्ट वाईट आहे. पण तसे आहे किंवा नाही हे कळल्यास बरे होईल.)
जर शास्त्रींना या सहभोजनाने धर्ममार्तंडांकडून बहिष्कृत केले जाण्याचे, त्यांच्या पोटापाण्यावर, कुटुंबीयांवर आपत्ती येण्याची शक्यता असतानाही त्यांनी त्यांना जे योग्य वाटते ते करण्यासाठी पाऊल पुढे टाकले असेल तर ते कौतुकासच प्राप्त आहेत.