आजकाल स्त्रिया मोटरसायकल / गाड्या चालवतात, किंवा नोकऱ्या करतात, ह्यात काय विशेष आहे असं आज आपण म्हणू शकतो. असं म्हणण्यातच कर्वे, राजा राम मोहन रॉय इत्यादींच्या कार्याचं यश आपल्या लक्षात येतं. तसंच जातपातीच्या बाबतीत आहे असं मला वाटतं. सावरकर, फुले, आंबेडकर, गांधी, ह्यांच्या कार्यांच्या यशामुळेच आज 'दांडेकरांनी केले त्यात काय विशेष' असा आपल्याला प्रश्न पडतो.
मूळ लेखांत वर्णन केलेल्या गोष्टी ऐकून मला त्या लोकांबद्दल कृतज्ञतेची भावना येते. दांडेकरांचं हे कृत्य जातीयता घालवण्याच्या वाटचालीमधलं एक पाऊल आहे. कितीही क्षुल्लक असलं तरी ते योग्य दिशेला आहे, आणि त्याचे आपण आभार मानायला काहीही हरकत नाही.
खिरें