१ वाटी हरबरा डाळीचे पुरण करून पाहिले. यामध्ये मध्यम आचेवर कूकर लावून कूकरच्या कमीतकमी ५-६ व जास्तीत जास्त ८-१० शिट्या करणे. नंतर रोळीत उपसून पाणी निथळायला ठेवणे. व नंतर साखर किंवा गूळ घालून हे पुरण शिजवले तर अजिबात पुरणयंत्र, मायक्रोवेव्ह, व मिक्सर ग्राइंडर मधून बारीक करायला लागत नाही. पुरण शिजवतानाच कालथ्याने डाळ बारीक करायची. असे जर ४-५ वाट्यांचे करून पाहिले आणि पूर्ण डाळ अजिबात शिल्लक राहिली नाही तर बाकीचा डाळ बारीक करण्याचा व्याप वाचेल. राईस कूकरमध्ये ही डाळ जास्त पाणी घालून शिजवण्याचा प्रयोग एकदा केला पाहिजे.