पुन्हा एकवार मुद्दा लक्षात घ्यावा - शास्त्रींना मी हा इतरेजनांवर उपकार करतो आहे असे वाटले असल्यास गोष्ट वाईट आहे. पण तसे आहे किंवा नाही हे कळल्यास बरे होईल.)
जर शास्त्रींना या सहभोजनाने धर्ममार्तंडांकडून बहिष्कृत केले जाण्याचे, त्यांच्या पोटापाण्यावर, कुटुंबीयांवर आपत्ती येण्याची शक्यता असतानाही त्यांनी त्यांना जे योग्य वाटते ते करण्यासाठी पाऊल पुढे टाकले असेल तर ते कौतुकासच प्राप्त आहेत.
यातील 'तसे आहे की नाही 'हे ७८ वर्षानंतर विचारणे कितपत संयुक्तिक?
उद्या कुणी ३०० वर्षे मागे जाऊन तत्कालीन परिस्थिती लक्षात न घेता संभाजी/राजाराम/पेशवे/महादजी शिन्दे/होलकर याना त्यांचा हेतू शुद्ध असेल तर ही गृहितकं मांडून वाद करु लागला व लष्कर वा नेपोलियन वा इतर असंबद्ध उदाहरणे देऊ लागला तर प्रतिवाद न करणे उत्तम.
तपासण्याची यंत्रणा प्रश्न्कर्त्यापाशी आहे कां? की उगीचच एक टपली ?
सुधारणेकरिता टाकलेले प्रत्येक पाऊल कौतुकास्पदच!मग ते ९९ वर्षे कर्मठपणा करणाऱ्या ३.५% वाल्यानी कां असेना .
कृपया एकलव्यानी गैरसमज करुन न घेणे.
इतरांचा एकांगी दृष्टीकोन त्याना लखलाभ.