भाष, खूपच सुंदर गोष्ट आहे. इथे लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
कथा वाचून काही प्रश्न मनात उभे राहिले. जसे मनात आले तसेच इथे नमूद करत आहे. चु.भू.द्या.घ्या.
- पुत्रप्रेम म्हणजे आसक्ती तर मग प्रेमळ तातांबद्दल इतकी विरक्ती म्हणजे अध्यात्म?
- कर्तव्यपूर्ती केल्याशिवाय अध्यात्माची परीक्षा पास होणे शक्य आहे का?
- कर्तव्याकडे पाठ फिरवून स्वतःचीच उन्नती साधण्याचा प्रयत्न म्हणजे स्वार्थी वृत्ती असं म्हटलं तर?
- घरदार सोडूनच ( थोडक्यात सततच्या परीक्षांपासून सोपेपणाने सुटका मिळवून घेऊन ) अध्यात्म प्राप्ती करून घेऊन उन्नती साधता येते का?
- सांसारीक जबाबदाऱ्या पार पाडतापाडता अध्यात्मप्राप्ती करणे अजिबातच शक्य नाही का? अशी अध्यात्मप्राप्ती करता येत असल्यास ती दुय्यम दर्जाची मानली जाईल का?