माझा मुद्दा हा फक्त १००% दोषी मानण्याचा वा सगळेच चूक म्हणण्याच्या विरोधात होता इतकेच. नेहरूंनी सर्वच अयोग्य केले नाही तसेच सर्वच योग्य केले असेही मी म्हणत नाही इतकेच.
तुम्ही मांडलेले मुद्दे नेहरूंच्या विरोधात असतील तर असोत. मी त्यावर चर्चा वा वाद करू इच्छित नाही. फक्त ही एक बाजू आहे एवढेच म्हणेन. मी नेहरूंचा समर्थक नाही वा विरोधकही. त्यामुळे त्यांची बाजू वा विरोधी बाजू मांडणे माझ्यावर बंधनकारक नाही. परंतु 'नेहरूंनी सगळेच चुकीचे वा वाईट केले' या मुद्द्याला मी आक्षेप घेईन व विरोध करेन. माझा विरोध एकांगी विधानाला होता. बाकी तुम्ही नेहरूंच्या चुका दाखवल्यात तर तो तुमचा प्रश्न.
नेहरूच काय पण इतर कुठल्याही राष्ट्रनेत्याबद्दल जर एकांगी लिखाण केले तर मी त्याचा नक्कीच निषेध करेन. एवढेच म्हणेन की काही निर्णय निरपवादपणे चूक असतील, काही पश्चातबुद्धीने (on hind-sight) चूक ठरतील, पण म्हणून असे एकांगी मूल्यमापन हा कृतघ्नपणा आहे.
- विचक्षण
-विचक्षण