काय की फ्वाडनीचा भात बी लई आवडतोय की आमास्नी पर झनझनीत खायला घालतु सांगुनशान असला शीळा, बुरसटलेला भात खायला घातला तर आमचं पाय बदामाचा शिरा आन केशरी भाताकडेच वळायचं ना. काय करनार आमच बी प्वाट हाय. कायतरी खाऊनशान आजारी का वं पडा??

जातोस तर जा बाबा! आमचाही राम राम घ्या.

---

असो.

घारे साहेब उत्तर आपल्याच भाषेत दिले राग मानू नये. खरं सांगायच तर असली मुक्ताफळे वाचून विशाद वाटतो.

माणसाने स्वतःसाठी लिहावे. त्यातून स्वतःला आनंद मिळतो म्हणून. आपलं मन सुखावत म्हणून. असं केल की दुसऱ्यांच्या 'केशरी भाताचा' हेवा वाटत नाही. जर तुमच्या लेखांना योग्य प्रतिसाद मिळत नसतील तर दोष कुणाचा?  आपल्यात सुधारणा करायच्या, इतरांना (तेच्यावर कुनी खुदुखुदु हंसलं, कुनी फदाफदा, तर कुनाला कुबट वास आला, त्येनं नाकावर कापड धरलं.) नावं ठेवायची की पळपुटेपणा करायचा हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे.

एकंदरीत असल्या प्रकारांनी आपण आपलीच शोभा करत असतो. आपल्या सारख्या ज्येष्ठ व्यक्तिला तर ते अजिबात शोभत नाही. इथे जर 'साधना कोळीण', 'रायगड', 'आवराआवरीचा क्रॉनिक आजार', 'वर्तुळ' सारखे लेख बाजी मारून जात असतील तर त्या लेखक/ लेखिकांचे कल्पक विषय पाहा, त्यांच्या शब्दरचना, परिच्छेद निर्मिती, व्याकरण, सहज संवाद साधण्याची किमया, खुसखुशीतपणा पाहा. एखादा अतिसामान्य माणूसही ते सहज समजू शकतो यातच त्यांच्या यशाचं रहस्य आहे. हे जर आपल्याला जमत नसेल तर मायबाप वाचकांनाच नावं ठेवायची ही पद्धत कुठली?

असा फुकाचा त्रागा करुन पळपुटेपणा करण्यापेक्षा आपल्या लेखणीला धाऱ लावता येते का त्याचा विचार करा. मग कदाचित असले राम राम ठोकायची गरज भासणार नाही.