चित्तरंजन,
तुमचे म्हणणे बरोबर आहे पण हा दोष केवळ मराठी भाषिकांत नाही. सिमला/शिमला,पंजाब, पटियाळा/पतियाला, चंडीगढ/चंदीगड, हरियाण/हरयाना ह्या उपरोल्लेखित जागांचे किती निवासी मुंबईस मुंबई म्हणतात हा संशोधनाचा विषय ठरेल. इतर मराठी शब्दांबद्दल न बोललेलेच बरे. अगदीच मुंबई म्हणावे लागले तर त्याचे बहुधा 'मुम्बाय' केले जाते.पुण्याचे सर्रास पूना, गावस्करचे गवास्कर,तेंडुलकरचे तेंदुलकर, इत्यादी इत्यादी.
तेव्हा मुद्दा बरोबर असला तरी त्याला मराठी भाषकांना, लेखकांना, वृत्तपत्रांना इतर भाषांतली मूळ नावे बरोबर माहीत नसतात.  असा मराठीद्वेषी रंग देऊ नका. एका बहुभाषिक देशात असे होणारच.