चांगल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल आभार.
हा प्रकार मराठीच्या बाबतीतही होतो.
अजूनमुंबईमधील अनेक वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी हे अमराठी आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे इथल्या ठिकाणाचे नाव चुकीचे उचारले गेले वा दाखवले गेले तरीही ते आपल्या मुख्य कार्यालयाला कळ्वत नसावेत.
उदा. सचिन तेंदुलकर (तेंडुलकर ) ड हा हिंदी मध्ये आहे तरीही. हा नावाशी खेळ का?
वरळी च्या जागी वर्ली
हे चॅनेलवाले भूगोलही बदलून टाकतात.
मीरा रोड, भाईंदर, कल्याण हे भाग ठाणे जिल्ह्यात असूनही कल्याण, मुंबई असे लिहिले जाते. हीच का बातम्यातील सत्यता?
अजून अशी अनेक उदाहरणे सापडतील .