उदा. सचिन तेंदुलकर (तेंडुलकर ) ड हा हिंदी मध्ये आहे तरीही. हा नावाशी खेळ का?
टोपेचे हिंदीवाले तोपे करतात. इंग्रजीत 'त' आणि 'ट' वर्ग वेगळे नाहीत. बरेचदा हे नाविक हाल इंग्रजीतल्या ह्या त्रुटीमुळे होत असावे, असे जाणकारांचे मत आहे. म्हणूनच डोळे इंग्रजीतून वाचल्यावर ते दोले लिहायची की डोले हे लोकांना कळत नाही.
गोंधळ झाल्यास त्या भाषेतला उच्चार भाषकाला विचारायला हवा. पण एवढीही तसदी पत्रकार, लेखक घेत नाहीत.
चित्तरंजन
अवांतर
भाषिक- भाषेसंबंधी, भाषेचा ह्या अर्थाने प्रचलित आहे.
भाषक- भाषा बोलणारा.