कलिजा खल्लास ! धुंद गाण्याची आठवण...

नरेंद्र,
माझ्या अत्यंत आवडत्या गाण्याचा तुम्ही केलेला अनुवाद खूपच झकास आहे. हा अनुवाद गुणगुणायला सुरूवातही झाली असती माझी पण बाकीच्या सगळ्या ओळी मस्तपैकी गुणगुणता येत असूनही नेमकी 'जिंदगीभर न पावसाची, विसरेल ती रात ।' हीच ओळ मला नीट म्हणता जमत नाही आहे. 'विसरेल' शब्दाशी काहितरी जबरदस्त गल्लत होतेय माझी. :-( कुठल्या अक्षराला जास्त महत्त्व देऊन कुठले अक्षर पट्कन उच्चारायचे ते सांगू शकाल का?

गुणगुणताना माझ्याकडून काही बदल आपोआप झाले. जसे की 'अनोळखीशा सुंदरीच्या' ऐवजी 'अनोळखी त्या सुंदरीशी' वगैरे वगैरे.. हे बदल कितपत योग्यायोग्य ते मला माहिती नाहीत, त्यामुळे माझी याबद्दल अळीमिळीगुपचिळीच योग्य ! असो.