श्री. सर्वसाक्षी,

'झोप' ह्या विषयावरील आपला लेख आणि त्याला लाभलेले अनेक निद्रिस्त अभिप्राय झोपेतच वाचले त्यामुळे अगदी स्वप्नवत वाटले. सुंदर. अभिनंदन.

माझ्या एका मित्राला उभ्या-उभ्या झोपण्याचीही सवय होती. (अजूनही असावी. बऱ्याच दिवसात, जागा किंवा झोपलेला, भेटला नाही.) आम्ही सर्वजण (तरुण असताना) महाबळेश्वरला गेलो असताना सकाळच्या वेळी कोवळ्या उन्हात गप्पा मारत उभे होतो. अचानक घोरण्याचा आवाज आला. चमकून बघतो तर काय आमच्या तिघांतला हा, निद्रादेवी भक्त, नुसता झोपलेलाच नव्हता तर चक्क, घोरत होता.