वेदश्री प्रतिसादाखातर धन्यवाद!

जिंदगी शब्द मराठी आहे का? विसरेल कसे म्हणायचे?
असे प्रश्न खरे तर मलाही आहेतच.
पण त्यांच्यावर अडून बसले तर अनुवाद पुढे सरकत नाही.
आपण काही शब्दसृष्टीचे ईश्वर नसतो.
शब्द अडतात. इतर आस्वादक नवे शब्द सुचवितात.
मग अनुवादास पूर्णत्व येऊ लागते.
ही एक निरंतर प्रक्रियाच असते.

तेव्हा अळीमिळी कशाला. चुप्पी तोडो.
माझे सर्वच अनुवाद ह्याच पद्धतींनी समृद्ध झालेले आहेत.
चक्रपाणिंच्या सूचना तर अनेकदा खूपच उपयुक्त ठरल्या आहेत.
म्हणून वाटतील त्या सूचना, अवश्य आणि हक्काने कराव्यात. स्वागत आहे.