आपल्या सर्वांपर्यंत हे क्षण पोहचल्याने माझा आनंद द्विगुणित झाला आहे.

ही चित्रे अंगणातील -- मी राहतो त्या गृहसंकुलाच्या -- आहेत. जाणकारांनी तपशीलही ओळखले असतीलच, पण येथे टाळतो आहे.

पाण्यातील विविधरंगी माश्यांची हालचाल टिपण्याचा प्रयत्न केलेला नाही... पण कासवे, मासे, बदके आणि हंस यांची जलक्रीडा खरोखरच नयनरम्य आहे. माश्यांच्या चाहुलीने इतर सारे पळ काढतात आणि पुन्हा काही क्षणांनी एकत्र येतात हे समूहनृत्य अनुभवायलाच हवे... आपल्यापर्यंत पोहचविणे माझ्या मर्यादेपलीकडे आहे.  

असो... पुन्हा एकवार धन्यवाद!!