ह्या वेशासं बुवांचे तात्यारावांच्या गायीबद्दलच्या विचारांना पाठिंबा होता काय ?
कुणाच्याही भूमिकेला दुसऱ्याचा १००% पाठिंबा असेल असे नाही.केवळ त्या कार्यक्रमाचा विचार करायला हवा. त्यानंतर गायीबद्दलच्या विचारांची देवाण्घेवाण झाली कां
ते माहीत नाही. इथे लेखकाचा हेतू केवळ एका आठवणीचा आहे तितकेच त्याकडे पहावे.
अगदी तात्यारावांनी देखील त्याबद्दल काय केले ?
याकरिता सावरकर-आंबेडकर पत्रव्यवहार पूर्ण वाचावा. संदर्भाशिवाय एखादे वाक्य तोंडावर फ़ेकणे केवळ सभेत ठीक. अभ्यासासाठी नव्हे. १९५६ साली जेव्हा सावरकर ७३ वर्षाचे होते तेव्हा काय अपेक्षा ठेवावी ? १९३७ सालीच याविषयावर सावरकर-आंबेडकर प्रदीर्घ चर्चा झाली आहे.
आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला, तेव्हा त्यांची मनधरणी कुणी केली का ?
याचे उत्तर -नाही. ज्यानी नाना प्रयत्नानंतरही ठाम निश्चय केला होता त्याना कसे अडवणार ?
अगदी तात्यारावांनी देखील त्याबद्दल काय केले ?
ते वाचा त्यांच्याच शब्दात साहित्य विभागात. लवकरच मिळवून तेथे देत आहे.