अबुधाबीला ऑफिसमधे मी नविनच असताना एक सुदानी गृहस्थ मला नेहमी ब्रिया म्हणायचे. त्यांना पुन्हा पुन्हा सांगितल तरी त्यांची गाडी ब्रियावरच अडकलेली. मी मारे त्यांना लिहूनही दाखवल की "P" तरी हे आपले ब्रियाच वरच अडलेले.
शेवटी काय येडा माणूस आहे म्हणून मी नाद सोडला. नंतर बरेच दिवसांनी मला प आणि ब चा घोळ कळला.