दोन्ही आपण तसेच ठेवले असावेत. दुरूस्तीकरणाचा हा प्रयोग योग्य आहे, कोणी यास शुद्धिकरण म्हणत असतील तर म्हणोत बापडे. म्हणजे धिंग्रा नव्हे ढिंग्रा, नानगल नव्हे नंगळ वगैरे. मग बॉम्बे नव्हे मुंबई. कॅलकटा नव्हे कोलकाता. सिंधिया नव्हे शिंदे. कारण मूळ उच्चार आम्ही आचारात आणि विचारात आणले पाहीजे. पॅरिस चे पाघी वगैरे. मग यासाठी शब्दाच्या झालेल्या अपभ्रंशाचीच मर्यादा ठेवायची का? की सगळेच 'नाविक छळ' दूर करायचे? जसे औरंगाबाद, उस्मानाबाद, हैद्राबाद वगैरे? सांगावे.
(सदर विषयाची मर्यादा मी समजू शकतो पण सदर प्रस्तावाच्या मध्यवर्ती कल्पनेमागली दुरुस्तीकरणाची/ शुद्धिकरणाची मर्यादा कोठवर ताणावी? कळावे. धन्यवाद.)