कथा आवडली. फक्त 'विजू' हा मुलगा नसून मुलगी आहे हे कळावयास जरा उशीर लागला. ते कळल्यावर पुन्हा तो परिच्छेद वाचला आणि लिंक लागली. सुरुवातीचे नाते संबंध, कथानकातील व्यक्ती नीट व्यक्त झाल्या नाहीत असे वाटते. पण जस जसे पुढे-पुढे वाचत जावे तस तसे संदर्भ उकलत जातात आणि कथा पकड घेते.
पुढे येणाऱ्या घटनांची आगाऊ कल्पना आली तरी रसभंग होत नाही.
कथेच्या सर्वोच्च बिंदूवर एका वाक्याचा शेवट लेखनशैलीतील परिपक्वता दर्शवितो.
वरील काही प्रतिसादात अपेक्षिलेला 'लढा' (आणि कदाचित नायिकेचे यश) कथेला सर्वसामान्य कल्पनांच्या चाकोरीत अडकविणारा शेवट देऊन गेला असता. सत्तेपुढे हजार अपयशी ठरतात, एखादाच यशस्वी ठरतो. नेहमी यशस्वी नायकांचे/नायिकांचे कौतुक होते/कथानक होते. समाजापुढे एक चांगले उदाहरण म्हणून ते योग्यही असते. पण हजार अपयशी नायक/नायिका ज्या भयानक दुःखद मनोवस्थेतून जातात त्याला वाचा कोण फोडणार? त्यामुळे कथेचे 'वेगळेपण' मनाला स्पर्श करणारे आहे.
त्याचप्रमाणे, सत्ताधीशांचा निरंकुश बळाचा वापर, स्वार्थ आणि ढोंगीपणा हाही कथेचा मध्यबिंदू, कथेचे मुख्य सूत्र असू शकते.
असो. कथा उत्तम आहे. सुरुवातीच्या मुद्द्यांकडे लक्ष दिल्यास अजून प्रभावी होईल.
अभिनंदन.