सर्व प्रथम संजोप रावांचे आभार. तुम्ही चांगली मते मांडत आहात. अहो अशा ठिकाणी तर असे विषय चर्चिले गेलेच पाहिजेत. माझे काही मुद्दे असे...
- शेती ही न शिकलेल्या माणसांचा उद्दोग हा सामाजिक गैर समज.
- लोकसंख्या, त्यातली नात्यांची क्लिष्टता या मुळे जमीनीचे असंख्य तुकडे झाले आहेत आणि त्यात व्यावसायिक विचार फारच कमी.
- ज्या उच्च शिक्षितांना जमीन घेऊन शेती करायची आहे त्यांना येणारी कायद्याची बंधने. (घरची शेती असल्या शिवाय शेती विकत घेता येत नाही असे ऐकले आहे)
- शेतीचा वापर करून बोकाळलेले आणि नासलेले राजकारण.
- या वर सामूहिक शेती हा चांगला उपाय आहे.
- निर्यात डोळ्यासमोर ठेवूनच शेती करावी. नाशिकाला असा कांदा जर्मनीसाठी पिकवला जातो असे वाचले आहे.
- वाइन उद्योगाला चालना - निर्यातीची भरपूर संधी आहे.
- शेती व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम चालू करणे गरजेचे...