आमच्या इथले एक गृहस्थ शब्दा शब्दागणिक हरि हरि म्हणत असत.
म्हणजे ते हात जोडून हरि हरि म्हणाले तर 'नमस्कार' म्हणत असणार,
हात वर करून हरि हरि म्हणाले तर 'रामराम जातो आता' म्हणत असणार,
असे लोक समजून घेत असत. आणि
लोक आपापसांत त्यांचा उल्लेख 'हरि हरि' आले होते, असाच करीत.