"संत ज्ञानेश्वर" चित्रपटांत असे दाखविले आहे की ज्ञानेश्वरांच्या विरोधांत असलेल्या तत्कालीन ब्राह्मणांनी "रेड्याकडून वेद" या गोष्टीची संभावना "गारुड्याचा खेळ" अशी केली होती. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर आवाज फेकण्याचे तंत्र (व्हेंट्रिलोक्विझम) वापरून बोलक्या बाहुल्यांचे खेळ करणारे प्रभाकर पाध्येही रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेऊ शकतात.