धन्यवाद सर्वसाक्षी. एखाद्या छापील वृत्तपत्रात प्रकाशित करा असे सुचवावेसे वाटते. अतिशय तपशीलवार आणि सुरेख लेख.
इकडे मानवतेच्या पुजाऱ्याने 'भ्याड कृत्य', 'असमर्थनीय वर्तन' वगरे पोपटपंची केली.या वाक्याबाबत मात्र आपला जळजळीत निषेध करावासा वाटतो. मनोगतावरच अन्यत्र कुणीतरी नेहरूंबद्दल असेच बेजबाबदार विधान केले होते. हल्ली नेहरू-गांधींना शिव्या दिल्याशिवाय आपले राष्ट्रप्रेम सिद्ध होत नाही असे दिसते.
चुका सर्वांकडून होतात, गांधीं-नेहरूंसारखी मोठी माणसेही त्याला अपवाद नसतात. पण म्हणून असे कुत्सित लिखाण करावे हे अशोभनीय आहे. हेच वाक्य अधिक सभ्य भाषेत लिहिता आले असते असे वाटते. तुम्हाला गांधींचे सर्वच निर्णय पटतील असे नाही (मलाही पटत नाहीत). परंतु संपूर्ण आयुष्य ज्यांनी देशसेवेत व्यतीत केले त्यांच्याबद्दल एवढी तीव्र घृणा ठेवणे कृतघ्नपणाचे लक्षण आहे.
गांधींसारख्या माणसाबाबत 'पोपटपंची' वगैरे शब्द वापरणे हे धक्कादायक आहे, आणि त्याहून धक्कादायक हे की हे वाचणाऱ्या फक्त एका व्यक्तीला हे धक्कादायक वाटले. हे इतर मनोगतींना खटकत नसेल (सन्जोपरावांचा अपवाद वगळून) तर दुर्दैवाने मनोगतावरील लोक फारसे सुजाण नाहीत असे म्हणावे लागेल आणि असल्या बेजबाबदार व्यक्तिंशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मनोगतावर येणे नको असे वाटते.
कुणीतरी सावरकरांचे लिखाण संपादित करावे असा प्रस्ताव दिला होता (सध्या ते बहुधा 'तरुणरसिक' नावाने मनोगतावर आहेत, चु. भू. द्या घ्या) त्यांना मी सहभागी होणाऱ्या व्यक्तींच्या हेतूबद्दल आणि कुवतीबद्दल विचारले होते. मला वाटते असे लिखाण इथे होत असेल तर मी तथाकथित सावरकरप्रेमींच्या गटात सहभागी झालो नाही हे योग्यच झाले असे वाटते.
ता. क. सन्जोपराव मला नाही वाटत या मुद्द्याला प्रशासकांचा बडगा दिसेल. दिसला तर तुम्हाला विचक्षण पुन्हा दिसणार नाहीत, प्रॉमिस.
-(डोळस देशप्रेमी) विचक्षण