मराठी अभ्यास परिषद ही संस्था पुण्यात आहे. १९८३ पासून मराठी भाषा, भाषाव्यवहार, व्याकरण आदींच्या अभ्यासाला संस्थेने वाहून घेतले आहे.
मराठी भाषा आणि जीवन ही परिषदेची त्रैमासिक पत्रिका. प्र. ना. परांजपे हे पत्रिकेचे संपादक आहेत. अशोक रा. केळकर, गं. ना. जोगळेकर, मॅक्सीन बर्नसन, अंजली सोमण हे पत्रिकेच संपादन सल्लागार आहेत.
जानेवारी (हिवाळा), एप्रिल (उन्हाळा), जुलै (पावसाळा), ऑक्टोबर (दिवाळी) असे एकूण तीन अंक वर्षभरात निघतात.
वार्षिक वर्गणी भरण्यासाठी पत्रिकेचे वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे आहे. वार्षिक वर्गणी व्यक्तीला रू. १००/-, पंचवार्षिक वर्गणी रू. ४५०/- परदेशात पाठविण्यासाठी टपालखर्च रू. १०० अधिक.
आजीव सदस्यांना पत्रिकेचा अंक पाठवला जातो. आजीव सदस्यत्व (फक्त व्यक्तींसाठी) वर्गणी रू. १००० आणि नोंदणी शुल्क रू. १००.
वर्गणी प्रत्यक्ष, रोखीने, किंवा धनादेशाने देता येईल. मनिऑर्डर पाठवू नये.
प्रकाशक, मुद्रक, व्यवस्थापकीय संपर्क व पैशांचा भरणा: