मला वाटते मी प्रस्ताव पाठवायची थोडी घाई केली.

वैशाली - अहो, नाही हो! घाई केली असे काही मनात आणू नका. केवळ सदिच्छेपोटी तुम्ही हा विचार मांडलात. आपल्या पुढाकाराचे स्वागत! काही सुव्यवस्थितपणा येण्यास या प्रस्तावाचा नक्कीच उपयोग होईल.
-------------------------------------

आता माझी भूमिका -

कामाच्या व्यापात असे वाढदिवस लक्षात येणे कठीण आहे. तसेच वाढदिवस लक्षात येऊन ते साजरेही करायला हवेत असेही नाही. त्यामुळे कोणी मुद्दाम हा विषय हाती घेऊन स्मरण करून देण्याचे काम घेतले नाही तरी चालण्यासारखे आहे.

परंतु कोणास अशी कोणाच्याही वर्षपूर्तीची जाणीव झाली; तर त्यानिमित्य एक क्षण मागे वळून पाहायला काय हरकत असावी? कामाच्या आणि काहीवेळा उगाचच पळापळीच्या जीवनात कृतज्ञता व्यक्त करण्याच्या, प्रेम दाखविण्याच्या मनातील अनेक गोष्टी राहून जातात. मनोगताच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहचविलेल्या आनंदाविषयी आभार मानायला वर्धापनदिनाचा मुहूर्त गोड ठरावा.

अवांतर - हे या खुल्या मंचावर कसे साधावे याविषयीचे माझे विचार येथे दिलेले आहेत.