एकमेकांशी जमाया लागले
जीवना आता कसे रे व्हायचे?

ऐकतो मृत्यो तुझ्याबद्दल किती
एकदा आहे तुला भेटायचे

वावा... खास आवडले... यावरूनच आदरणीय सुरेश भटांच्या पुढील शेराची प्रकर्षाने आठवण झाली -

इतुकेच मजला ज़ाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका ज़गण्याने छळले होते

(शब्दांतली/मांडणीतील चूक रसिकांनी पदरात पाडून घ्यावी ही नम्र विनंती..‌. आठवलेला शेर लिहिण्यावाचून रहावले नाही)