सन्जोप राव -

मदनलाल धिंग्रांचे हे कृत्य आणि त्या काळातील वागणे ह्यावर भ्याडपणाचा शिक्का मारणाऱ्या वक्तव्य म्हणजे भोळसटपणा किंवा धूर्तपणा यांपैकी काहीतरी एक असावे असे लेखकाला वाटते. ती भावना आणखी कोणत्या शब्दांत व्यक्त करणार?

गांधीजींवर विनाकारण आगपाखड करणारेही बरेच आहेत. पण टिळक/सावरकरांपासून ते आंबेडकर/फुले ते नेहरू/गांधींपर्यंत कोणत्याही महापुरुषाच्या विचारांशी असहमती व्यक्त करणे म्हणजे अतिसंवेदनशील विषय करून ठेवलेला आहे. देवदेवतांवरील टीकेपेक्षाही अधिक स्फोटक आहे हे प्रकरण! असो... आपला येथील वावर आणि विचार पाहता माझ्या भावना आपल्यापर्यंत पोहचतील ही अपेक्षा.

क्रांतीकारकांचा मार्ग अमान्य आहे किंवा योग्य नाही हे गांधीसूत्र सभ्य पातळीवर राहते. मात्र क्रांतीकारकांचा मार्ग भ्याडपणाचा आहे हे म्हणणे अक्षम्य वाटते... कृतघ्नपणाचे वाटते... भोळसटपणाचेही वाटते. (हे असे का नाही याची दुसरी बाजूही वाचलेली आहे. कोणी पुन्हा मांडल्यासही मोकळेपणाने सामोरेही जाईन.) भ्याडपणाच्या शेऱ्यांच्या गांभीर्याच्या तुलनेत साक्षींचा पळपुटेपणाचा शेरा खूपच सभ्य मानावा लागेल. 

अवांतर - जाता जाता - माझी राजकीय विचारसरणी याची ठोकळमांडणी येथे बिलकुल महत्वाची नाही. तसेच आपली कोणती हेही नाही. त्याबाहेर पडून आपल्याशी हा खुला संवाद आहे.