विचक्षण महाशय,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
सत्य हे कटु असले तरी ते सत्य असते. ते डोळसपणे व खुल्या दिलाने स्विकारले पाहिजे. माझे विधान हे बेजबाबदार नसून पूर्ण सत्य व संयत आहे. आपल्या गांधीप्रेमामुळे त्या विधानावर आपण संतप्त झाला असाल तर माझा नाइलाज आहे. आपले आदर्श व त्यांच्याविषयीच्या आपल्या भावना मी समजू शकतो. पण त्याने वस्तुस्थिती बदलत नाही.
कोट्यावधी हिंदुस्थानीयांना वंदनिय असणाऱ्या प्रत्येक हुतात्म्याबद्दल ज्याने अनुदगार काढले त्याच्याविषयी एक राष्ट्रभक्त या दृष्टिकोनातून आदर असणे शक्य नाही.
अहो भगतसिंग प्रभृतींना हत्येबद्दल फाशी योग्यच आहे असे म्हणणारे गांधी हे सोयिस्कर रित्या विसरले की भगतसिंगाने गोळ्या झाडल्या त्या साँडर्स च्या मृतदेहावर व त्याही विटंबना करण्यासाठी नव्हे तर आपल्या नेत्याविषयीच्या प्रखर भावना व लाखो देशवासियांचा जळजळीत निषेध व्यक्त करण्यासाठी. म्हणजे तो हत्येस जबाबदार नव्हताच! हे काय गांधींना माहित नव्हते? दुसरे असे की भगतसिंगाला हत्येसाठी सजा मिळालीच पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या गांधींनी ज्या स्कॉटने शस्त्रहीन व शांततामय आंदोलन करणाऱ्या लालाजींचा बेदम मारहाणीने निर्घृण खून केला त्या स्कॉटला जाब का विचारला नाही? त्याला फाशी व्हावे म्हणून ते उपोषणाला का बरे बसले नाहीत?
ज्याला असामान्य शौर्याचे प्रतिक मानले गेले त्या मदनलाल धिंग्रांचा निषेध करणाऱ्या गांधींना आम्ही काय किंमत द्यावी?
गांधी हे प्रथम हिंदुस्थानचे एकमेव नेते, मग महात्मा आणि मग उतरत्या भाजणीने अखेरीस देशभक्त होते. धिंग्रांपासून ते नेताजी सुभाषांपर्यंत सर्व क्रांतिकारकांचा उपहास करणारे गांधी त्यांच्या विरुद्ध लोकमत चिथावत होते व त्यासाठी आपली लोकप्रियता ते पणास लावत होते.
वृत्तीने गांधी हे हुकुमशाहा होते व त्यांनी लोकशाही मूल्यांना अजिबात थारा दिला नव्हता. १९३९ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीत नेताजींनी गांधी पुरस्कृत पट्टाभी सितारामय्यांचा जेव्हा सडकून पराभव केला तेव्हा तो विजय किमान लोकशाही व जनमताचा आदर यास्तव तरी त्यांनी मान्य करायलाच हवा होता, तरीही ते त्यांच्या विरुद्ध गरळ ओकत राहीले हा इतिहास आहे. या उलट भगतसिंगापासून ते नेताजींपर्यंत कधीही कुणीही त्यांचा अवमान वा उपहास केला नाही, कारण ते स्वार्थातून मुक्त झालेले महात्मे होते.
समस्त क्रांतिकारकांचा असा द्वेष करण्याचे कारण जाहिर आहे, त्यांना हे धगधगते अंगारे आपल्या लोकप्रियतेचे प्रतिस्पर्धी वाटत होते.
पोपटपंची हा शब्द मी आवर्जून वापरला कारण पोपटाप्रमाणे प्रत्येक तेजोक्षोभाच्या प्रसंगी ते तेच ते निषेधाचे सूर आळवायचे.